‘इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या’ : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धावरून चीनला इशारा दिलेला असतानाच आता आपल्या नौदलाला इराणची बोट पाहिल्यास ती उडवून देण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी ट्विट करत त्यांनी या आदेशाची माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.

गेल्या आठवड्यात इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स नेव्हीचे 11 नेव्ही वेसल्स आखाती समुद्रात अमेरिकन नेव्ही शिपच्या अगदी जवळ आले होते. समुद्रात, दोन्ही देशांची जहाजे इतकी जवळ आली होती की ते एमकांशी भिडतील असे वाटले होते. पण इराणी नौदल कुवेतमध्ये एक ड्रिल घेत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अमेरिकेच्या नौदलाने घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात इराणी नौका अमेरिकन नेव्ही जहाजाच्या अगदी जवळ होत्या. एका ठिकाणी इराणी बोटमधील मशीनगन अमेरिकन जहाजाला लक्ष करताना दिसत होती.

इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने या घटनेसाठी अमेरिकन नेव्हीला जबाबदार धरले. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डच्या वतीने सांगण्यात आले की, या घटनेस अमेरिकेची व्यावसायिक आणि आक्रमक वृत्ती जबाबदार आहे. त्यांना वारंवार इशारा देण्यात आला परंतू त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान रेव्होल्युशनरी गार्डने कोणताही व्हिडिओ प्रसिद्ध केलेला नाही.

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. इराणच्या युद्धनौकांनी असा आरोप केला आहे की, यूएस वेसल्स त्यांचे मार्ग अडवत आहेत. दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांनी ट्रम्प यांच्या हल्ला चढवताना एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लिहले की, दुसऱ्या देशांच्या कामात ढवळाढवळ करणे थांबवा. खासकरून आमच्या बाबतीत. पुढे ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही अमेरिकन राजकारण्याशी सल्लामसलत करत नाही विश्वास ठेवा. याला डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांचे उत्तर अशावेळी आले जेव्हा इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की त्यांनी लष्कराचा पहिला उपग्रह प्रेक्षेपित करून कक्षात स्थापित केला आहे.