अमेरिकेचा भारताला आर्थिक दणका ; व्यापारातील प्राधान्य संपवणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  अमेरिकेबरोबरच्या व्यापारात भारताला विशेष प्राधान्य मिळत असते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे भारताला मिळणारे विशेष प्राधान्य समाप्त करायचे आहे. तसं ट्रम्प यांनी स्वतः जाहीर केले आहे. अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमातर्गंत त्यांनी हे मुद्दे मांडले.

भारतात अमेरिकी उत्पादनांवर मोठया प्रमाणात कर आकारला जातो, हा मुद्दा ट्रम्प यांनी अनेकदा उपस्थित केला आहे. भारत सरकारबरोबर बरीच चर्चा झाली. पण अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समन्यायी वागणूक देण्याबाबत भारताकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे आपण भारताला मिळालेला लाभार्थीचा दर्जा समाप्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहोत, असे ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना म्हटले आहे. त्यांनी तसं पत्रात लिहीले आहे.

ट्रम्प यांनी भारताप्रमाणे टर्कीचाही जीएसपी कार्यक्रमांतर्गत लाभार्थीचा दर्जा समाप्त करायचा आहे. मागील ४ दशकात टर्कीच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे, असं सांगून त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, भारताला जीएसपीतून बाहेर काढण्यासाठी अधिसूचना काढल्यानंतर दोन महिन्यांनी अंमलबजावणी सुरु होईल. म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना मिळणारी कर सवलत बंद होईल. अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमाचा जगात भारत सर्वात मोठा लाभार्थी आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी एक झटका आहे.