डोनाल्ड ट्रम्प ‘अंगठे बहाद्दर’, नरेंद्र मोदी कधीही होऊ शकत नाहीत राष्ट्रपिता : असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद : वृत्तसंस्था – एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.  मोदींना ‘फादर ऑफ इंडिया’ म्हणून संबोधणारा ट्रम्प  हा एक आडाणी आणि कमी शिकलेला माणूस आहे. त्यांना  भारताबद्दल तसेच  महात्मा गांधी यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. ट्रम्प यांना जगाबद्दलही काही माहिती नाही.  एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य  केले आहे.

ट्रम्प यांच्यावर टीका करताना  ओवैसी  म्हणाले की , ‘मोदी कधीच ‘फादर ऑफ नेशन’ होऊ शकत नाही. त्यांची आणि गांधीजींची तुलनाच होऊ शकत नाही. ट्रम्प यांना हे माहीत असतं तर ते असे बोलले नसते.  महात्मा गांधींनी हा किताब मिळवला होता. लोकांनी त्यांचा त्याग पाहून हा किताब स्वत:हून त्यांना दिला होता. पंडित नेहरू आणि सरदार पटेल हे दोघेही देशातील थोर नेते होते. पण त्यांनीही कधी कुणी ‘राष्ट्रपिता’ म्हणाले नव्हते. मोदींना ट्रम्प  एल्विस प्रेस्ली म्हणालं होतं. त्यात तथ्य असू शकतं. कारण, एल्विस प्रेस्ली उत्तम गायचे आणि गर्दी जमवायचे. आमचे पंतप्रधान सुद्धा चांगलं भाषण देऊन गर्दी गोळा करतात. ट्रम्प हे इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांच्याशी ‘डबल गेम’ खेळताहेत. त्यांचा हा डाव समजण्याची गरज आहे. ‘

काय म्हणाले होते ट्रम्प –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक करताना  त्यांचा फादर ऑफ इंडिया असा उल्लेख केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होतं. मात्र तिथली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या परिस्थितीने हाताळली.

त्यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असाच केला पाहिजे. याचं कारण त्यांनी भारतातील परिस्थिती एखाद्या वडिलधाऱ्या माणसासारखीच सांभाळली. आम्ही त्यांना फादर ऑफ इंडिया असंच म्हणू असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर एल्विस प्रेस्लीसोबतही मोदींची तुलना ट्रम्प यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेस्ली यांच्याप्रमाणे लोकप्रिय आहेत. असं वाटतंय की एल्विस प्रेस्ली पुन्हा आले आहेत.

Visit : policenama.com