अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘उचलबांगडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असतात. कोणत्याही महत्वाच्या मुद्द्यावर ते आपले मत मांडत असतात. मात्र मंगळवारी त्यांच्या एका ट्विटने सर्वांना हैराण केले. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना हटवल्याचे ट्विट केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान बरोबर शांतता चर्चा असफल ठरल्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समजते.

Image result for जॉन बोल्टन

या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे कि, काल मी जॉन बोल्टन यांना सांगितले कि, आता व्हाईट हाऊसमध्ये तुमच्या सेवेची गरज नाही. अनेक मुद्द्यांवर त्यांचे आणि माझे मतभेद होत आहेत. मी त्यांना राजीनामा मागितला होता आणि त्यांनी तो माझ्याकडे दिला देखील. त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांचे आभार. पुढील आठवड्यात मी नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची घोषणा करेल. जॉन बोल्टन हे तिसरे सुरक्षा सल्लागार आहेत ज्यांना ट्रम्प यांनी पदावरून हटविले आहे.

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर मतभेद  –

जॉन बोल्टन आणि अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पीओ यांच्यात अफगाणिस्तान मुद्द्यावर नेहमीच मतभेद राहिले आहेत. पॉम्पीओ हे अफगाणिस्तानच्या चर्चेवर असमाधानी होते. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घ्यायला देखील त्यांचा विरोध आहे. त्यांनतर काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात अमेरिकी अधिकारी मारला गेल्यानंतर अमेरिकेने तालिबानबरोबर शांतता चर्चा स्थगित केली होती. त्यामुळे आता पुन्हा कधीही हि शांतता चर्चा होणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like