24 फेब्रुवारीला सायंकाळी ‘ताजमहल’ला भेट देणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि मेलानिया ट्रम्प

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारतात येणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी ते आग्र्यात ताजमहाल पाहण्यासाठी जाऊ शकतात. दोघंही 24 फेब्रुवारीच्या सूर्यास्ताला ताज पहायला जाऊ शकतात.

याआधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या 24 फेब्रुवारीच्या अहमदाबाद दौऱ्यापूर्वी अमहदाबाद नगर निगमनं शनिवारी नमस्ते ट्रम्प असे पोस्टर ट्विट केले होते.

22 किमी लांब रोड शो करणार ‘मोदी – ट्रम्प’
ट्रम्प अहमदाबादला आल्यानंतर प्रसिद्ध गांधी आश्रमाला भेट देणार आहेत. याशिवाय ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 22 किमी लांब रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत. यानंतर दोन्हीही नेते मोटेरामध्ये नव्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करणार आहेत. येथे ते एका सभेला संबोधित करतील. यात सभेत 1 लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याआधी असा अंदाज लावला जात होता की, या कार्यक्रमाचं नाव खेम छो ट्रम्प असेल परंतु आता पोस्टर समोर आल्यानंतर कंफर्म झालं आहे की, आता या कार्यक्रमाचं नाव नमस्ते ट्रम्प असं असणार आहे.