खुलासा ! कोरोनाची ‘लस’ बनवणार्‍या जर्मनीच्या कंपनीला 7500 कोटींना विकत घेणार होते डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने चीनमध्ये बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवले आहे, परंतु आशिया व युरोपवर कोरोनाचे सावट अजून आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ६५०० हून अधिक मृत्यू झाले आहेत, तर १ लाख ७० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. एकीकडे जगभरातील वैज्ञानिक कोरोना लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे जगातील मोठमोठ्या औषध कंपन्या त्यात नफा पाहताना दिसून येत आहेत.

जर्मनीतील एक वैद्यकीय फर्म कोरोना विषाणूची लस बनविण्याकरिता अग्रणी मानली जाते. आता या वैद्यकीय फर्मने एक खुलासा करून संपूर्ण जगाला चकित केले आहे. एका वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने त्या फर्मला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा जर्मन औषधी कंपनी क्युअर वेक (CureVac) यांनी केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या बैठकीत केवळ ट्रम्पच सामील नव्हते तर हे संशोधन अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठीची त्यांनी ऑफर दिली.

काय आहे प्रकरण ?

क्युअर वेकचे मुख्य कार्यकारी डॅनियल मेनिशेला म्हणाले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या बैठकीला काही काळ उपस्थित होते. या बैठकीला ट्रम्प यांच्यासह उपराष्ट्रपती माइक पेंस देखील उपस्थित होते, ज्यांना व्हाईट हाऊस कोरोना व्हायरस टास्क फोर्सची जबाबदारी देण्यात आली आहे. मेनिशेला म्हणाले की, काही दिवसातच आम्ही लस तयार करू असे त्यांना सांगितले होते. एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांनी लस बनवण्याच्या विशेष अधिकार आपल्याकडे येण्यासाठी क्युअर वेकला १ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ७५०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ट्रम्प यांची इच्छा होती की कोरोनाची लस फक्त आणि फक्त अमेरिकेतच तयार व्हावी.

जर्मनीमध्ये सर्वांना तेव्हा धक्का बसला जेव्हा अमेरिकन वंशाच्या डॅनियल मेनिशेलाने अचानक कंपनी सोडण्याची घोषणा केली. त्यांनी याबाबतचे कारण कोणालाही सांगितले नाही. तथापि, क्युअर वेक यांनी एक निवेदन जारी केले की मेनिशला यांना कोरोना लस बनविण्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा ‘स्टार’ असल्याचे वर्णन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्युअर वेकमध्ये आता मेनिशेला यांची जबाबदारी इंगमार होयर यांना देण्यात आली आहे.

ट्रम्प प्रशासनाने या आरोपांना उत्तर दिले नाही

एका वृत्तपत्रानुसार ट्रम्प कार्यालयाकडून अद्याप या आरोपांवर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. वृत्तपत्रांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिहिले आहे की, फक्त क्युअर वेकच नाही तर अशा प्रकारच्या जवळपास २५ वैद्यकीय कंपन्या आहेत, ज्यांच्याशी या संदर्भात चर्चा सुरू आहे. अमेरिकेला वाटते की फक्त कोरोनाची लस शोधण्यात यश मिळावे आणि संपूर्ण जगाला यापासून सुटका मिळावी. मात्र, ही बातमी उघडकीस आल्यानंतर जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस खरेदी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी चर्चा झाली.

जर्मन मंत्र्यांनी संपूर्ण घटनेची केली पुष्टी

रविवारी पत्रकार परिषदेत जर्मन सरकारमधील मंत्री होर्स्ट सीहॉफर यांनी ट्रम्प प्रशासनाने ही लस विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची पुष्टी केली. सीहॉफर म्हणाले की आम्हाला याची जाणीव आहे आणि सरकार या प्रकरणावर गांभीर्याने विचार करीत आहे. जर्मन सरकारनेही कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑफर केल्याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्युअर वेक यांचे अमेरिकेतही बोस्टनमध्ये कार्यालय आहे आणि बरेच अमेरिकन शास्त्रज्ञही यात कार्यरत आहेत.