किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वाशिंग्टन :  पोलीसनामा ऑनलाइन  –  उत्तर कोरियाचे चांगलेच गाजलेले हुकूमशहा किम जोंग उन मृत्यूशी झुंज देतायेत अशा बातम्या पसरल्या आणि त्यावर डोनाल्ड ट्रम्प प्रतिक्रिया देणार नाहीत म्हणजे काय ? डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच हा संदर्भात असे म्हंटले आहे कि, किम जोंग उन यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, अमेरिकन गुप्तचर विभागाने दिलेल्या बातमीनुसार त्यांची हृदयविकाराची शस्त्रक्रिया हि यशस्वी झाली नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती हि गंभीर आहे. मी त्यांना मनापासून बरे होण्याच्या शुभेक्षा देतो तसेच त्याजागी जर दुसरे कोण असले असते आणि अशी परिस्थिती असती तर आह्मी युद्ध केले असते पण आम्ही युद्ध करणार नाही.

अमेरिकन गुप्तचर संघटनांनी हि बातमी जरी दिली असली तरी दक्षिण कोरियाच्या सरकारी सूत्रांनी किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच न्यूज एजन्सी रायटर्स डेली एनके ने किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असून त्यांचे हृदयाचे ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी दिली आहे तसेच किम हे सियोलच्या माउंट कुमगांग मध्ये विश्रांती करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे… आता किम जोंग उन यांची प्रकृती खरच गंभीर आहे का नाही हे तर फक्त त्यांच्या निकटवर्तीयांनाच माहित असेल.