…जर ‘गडबड’ झाली तर एवढं सैन्य पाठवेल की ‘बस्स’, तालिबानच्या कराराबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याच काळाच्या चर्चेनंतर अमेरिका-तालिबान शांतता करार झाला आहे. दोन्ही बाजूने अफगाणिस्तानात शांती कायम ठेवण्यावर प्रस्ताव पुढे नेला, यानंतर अमेरिका आता आपले सैन्य अफगाणिस्तानातून परत बोलाण्याच्या तयारीत आहे. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की काहीही चूकीचे घडल्यास, काही गोंधळ घातल्यास परत इतके सैन्य पाठवेल की तुम्ही विचार देखील करु शकणार नाहीत.

वॉशिंग्टनमध्ये माध्यमांशी बोलाताना ट्रम्प म्हणाले की मी लवकरच तालिबानी नेत्यांची भेट घेईल. ही ऐतिहासिक संधी आहे. सध्या अफगाणिस्तानात अमेरिकेचे 15 हजारच्या आसपास सैन्य आहे. अमेरिका मागील 18 वर्षांपासून तेथे लढा देत आहे.

ट्रम्प यावेळी म्हणाले, जर काही चूकीचे घडले तर आम्ही तेथे परत जाऊ. मी पुन्हा स्पष्ट करतो की आम्ही पुन्हा जाऊ आणि पूर्ण ताकदीने परत जाऊ. ज्याची कोणी कल्पना देखील केलेली नसेल. परंतु मला वाटते की याची गरज लागणार नाही, मी अशीच अपेक्षा करतो.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी लवकरच तालिबानी नेत्यांना भेटेल. लवकरच तालिबान आम्हाला मदत करुन दहशतवाद्यांना मारेल. ते लवकरच आमच्या लढाईमध्ये सहभागी होईल. ट्रम्प म्हणाले की अफगाणिस्तानात आम्हाला चांगले यश मिळले आहे, आता वेळ आहे की आम्ही आमच्या लोकांना परत घेऊन येऊ.

तालिबानसोबत झालेल्या करारानंतर माहिती देताना ट्रम्प म्हणाले, तालिबानसोबत जो करार झाला आहे, त्यानुसार 14 महिन्यात आम्ही आमचे सैन्य परत बोलावू. अमेरिका आणि तालिबानने कतारमध्ये या करारावर स्वाक्षरी केली, यावेळी भारतासह अन्य देशांचे प्रतिनिधी देखील तेथे उपस्थित होते.

अमेरिकेत येत्या काही महिन्यात अध्यक्ष पदासाठी निवडणूका होणार आहे. हा करार ट्रम्प यांना फलदायी ठरु शकतो. यामुळे ते त्यांच्या प्रचार सभेत अफगाणिस्तानातून आपण सैन्य परत बोलावले असे सांगत प्रचारात रंग भरत आहेत.