सुप्रीम कोर्टात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प, मागितली ट्विटरवर टीकाकारांना ‘ब्लॉक’ करण्याची परवानगी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर टीकाकारांना ब्लॉक करण्यासाठी अमेरिकन सुप्रीम कोर्टाकडून परवानगी मागितली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी 2017 मध्ये टीकाकारांना ब्लॉक केले होते. तथापि, त्यावेळी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर लोअर फेडरल कोर्टाने सांगितले होते की, ट्रम्प अधिकृत माहितीचे ट्विट करतात, त्यामुळे ते टीकाकारांना ब्लॉक करु शकत नाहीत. यामुळे टीकाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास नुकसान पोहचेल. आता ट्रम्प यांनी या निर्णयाला आव्हान दिले आहे.

मे महिन्यात सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन ट्वीटना ‘भ्रामक माहिती’ पसरवणारे असे वर्णन केले होते. ट्रम्प यांच्या या ट्विटसह ट्विटरने ‘फॅक्ट चेक’ वॉर्निंग देखील लावले होते. ट्विटरच्या या पाऊलानंतर, ट्रम्प संतापले आणि त्यांनी ट्विटर फॅक्ट चेकला चुकीचे ठरविले. ट्रम्प यांनी ट्विटरवर अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. अलीकडेच ट्विटरने ट्रम्पच्या मुलाविरूद्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्वाइनवरून कारवाई केली होती. सोशल मीडिया कंपनीने जूनिअर ट्रम्प यांचे ट्विट हटवले होते आणि त्यांचे खाते 12 तासासाठी मर्यादित केले होते.

जून आणि ऑगस्टमध्येही हटविले गेले ट्रम्प यांचे ट्वीट आणि पोस्ट
जूनमध्ये ट्रम्प यांच्यासोबतही असेच काहीसे घडले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्यांनी त्यासह लिहिले होते की, ‘घाबरलेले मूल दुसर्‍या जातीयवादी मुलाच्या भीतीने पळून जात आहे’. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात जाहीर झालेल्या ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ चळवळीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. ट्विटरच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ वर्ष 2019 मध्ये प्रथमच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता, ज्यात एक गोरा आणि काळा मुलगा एकमेकांना मिठी मारण्यासाठी धावत आहे. हा व्हिडिओ सीएनएनच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे जिथे तो ‘रियल लाइफमध्ये सर्वोत्कृष्ट मित्र असे असतात’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, काळा मुलगा गोऱ्या मुलाला घाबरुन पळून जात आहे. या व्हिडिओमध्ये असेही लिहिले आहे की, गोरा मूलगा ट्रम्पचा मतदार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओला ट्विटरने ‘मॅनिपुलेटेड मीडिया’ असे मार्क करुन डॉक्टर्ड सांगितले होते आणि नंतर तो हटविला होता.

यापूर्वी ऑगस्टमध्ये फेसबुकवरून कोरोना विषाणूबद्दल चुकीची माहिती पसरविल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे एक पोस्ट हटवले गेले होते. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘हा व्हिडिओ चुकीचा दावा करतो. अशी कोणतीही वस्तुस्थिती नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाशी लढण्याची क्षमता असते. तर हा व्हिडिओ आमच्या धोरणांचे उल्लंघन आहे. ट्विटरने कारवाई करत त्यांचे पोस्ट देखील काढून टाकले होते.