भारत-चीन वादात ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची ‘ऑफर’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत आणि चीनदरम्यान गलवान खोर्‍यात जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहे. भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेला सीमावाद सोडविण्यास तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आशियातील दोन मोठ्या देशांना यासाठी मदत करण्याच्या प्रस्तावाचा त्यांनी पुर्नउच्चार केला. भारत आणि चीन या देशांना वादावर तोडगा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. जर आम्ही मदत करू शकलो तर ते आम्हाला आवडेल, असे ट्रम्प म्हणाले. भारत आणि चीनच्या लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांदरम्यान लडाखमधील सीमावाद सोडवण्यासाठी एक बैठक पार पडली. त्यावेळीच ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.