इस्लामी कट्टरपंथाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदी पुरेसे : डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – इस्लामी कट्टरपंथाचा सामना करण्यासाठी मोदी पुरेसे आहेत असे  विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या यशानंतर ट्रम्प यांच्याकडून मोदींची स्तुती केली आहे. ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरबाबत काही तोडगा काढल्यास मला बरेच वाटेल, असेही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चा व्दीपक्षीय संबंधावर चर्चा केली. त्यांनतर ट्रम्प म्हणाले की , इस्लामी कट्टरपंथाचा सामना करण्यासाठी मोदी पुरेसे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरबाबत काही तोडगा काढल्यास मला बरेच वाटेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे एकमेकांची भेट घेतील. त्यांच्या चर्चेतून सकारात्मक आणि चांगले काहीतरी समोर येईल.’

मोदी म्हणजे ‘फादर ऑफ इंडिया’-

ट्रम्प यांनी मोदींनी भारतात केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी मोदींचं कौतुक करताना त्यांचा फादर ऑफ इंडिया असा उल्लेख केला. मोदींच कौतुक करताना ट्रम्प यांनी त्यांची तुलना प्रसिद्ध गायक, अभिनेते एल्विस प्रेस्लीशी केली. ट्रम्प म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेस्ली यांच्याप्रमाणे लोकप्रिय आहेत. असं वाटतंय की एल्विस प्रेस्ली पुन्हा आले आहेत.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारत हा  मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा देश आहे. मात्र असे असतानाही भारतात खूप कमी लोक कट्टरपंथीय आहेत. भारताने आतापर्यंत पाकिस्तानशी चर्चा प्रयत्न केला मात्र आता चर्चा तेव्हाच होईल जेव्हा पाकिस्तान दहशदवादाचा नायनाट होईल. मात्र असे होताना दिसत नाही. ‘नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

Visit : policenama.com