‘माझा मुलगा 15 मिनिटात झाला ‘कोरोना’मुक्त’, डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा

पोलीसनामा ऑनलाइन : वृत्तसंस्था – एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर त्यातून बरं होण्यासाठी साधारण एक आठवडा किंवा 10 दिवस लागतात. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याच दरम्यान एका अजब दावा केला आहे. माझा मुलगा 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

पेंसिलवेनिच्या (Pennsylvania) मार्टिन्सबर्ग येथे एका निवडणूक रॅलीत ट्रम्प आपल्या समर्थकांसोबत संवाद साधत होतेत. यावेळी त्यांनी मुलाला झालेल्या कोरोनाबाबत (Covid-19) माहिती दिली. आपल्या मुलाच्या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, “बॅरेनच्या (Barron Trump) कोरोना टेस्टबाबत मी डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी मला त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं सांगितलं. 15 मिनिटांनी पुन्हा त्याच्या तब्येतीलबद्दल विचारलं डॉक्टरांनी तो कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं” असा ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळं तो 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला. यानंतर त्यानं शाळेत जायची इच्छा बोलून दाखलवी असंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं.

ट्रम्प यांना अमेरिकेतील शाळा सुरू करायच्या आहेत. परंतु अनेक राज्य त्यांच्या या निर्णयाशी समहत नाहीत. मुलांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळं ट्रम्प निवडणूक रॅलीतून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि निवडणूक रॅलीत आपल्या मुलांचं उदाहरण देत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like