चीनच्या बाबतीत नरमाईची भूमिका असल्यानं बिडेन भारतासाठी योग्य नाहीत : ज्यूनियर ट्रम्प
न्यूयॉर्क : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पुत्र ज्यूनियर ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात विश्वासाचे नाते आहे. दोन्ही नेत्यांना चांगले माहित आहे की, भारत-अमेरिका जगात समाजवाद आणि साम्यवादाच्या विरूद्धच्या लढाईत सोबत आहेत. ज्यूनियर ट्रम्प यांनी जुन्हा आठवणींना उजाळा देताना म्हटले की, भारतात त्यांच्या वडिलांचे खुपच शानदार स्वागत करण्यात आले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र जॉन ट्रम्प ज्यूनियर यांनी न्यूयॉर्कमधील एका संमेलातील मुलाखतीमध्ये म्हटले की, माझ्यासाठी ही अभिमानाची बाबत आहे की, दोन्ही नेत्यांमध्ये महान आणि शक्तीशाली नाते आहे. हे संबंध भविष्यात दोन्ही देशांना लाभदायक ठरतील. राष्ट्रपती ट्रम्प आणि पीएम मोदी यांची मैत्री जगाने पाहिली आहे. ट्रम्प-मोदी यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांचे संबंध खुप सुधारले आहेत.
ज्यूनियर ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रेटिक उमेदवार जो बिडेन यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, भारतासाठी ते योग्य नाहीत, कारण चीनच्या बाबतीत त्यांची भूमिका नरमाईची होऊ शकते. न्यूयॉर्क येथील लांग आयलँडमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आम्हाला चीनचा धोका समजून घ्यावा लागेल, तो तुमच्याशिवाय चांगला कुणी ओळखू शकत नाही. त्यांनी जो बिडेन यांच्या भ्रष्टाचारावर लिहिलेले पुस्तक लिबरल प्रिविलेजच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले.
बिडेन-हॅरिस यांच्या समर्थनासाठी भारतीयांची ‘गेट आउट दि वोट’ रॅली
राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रेट उमेदवार जो बिडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांच्या समर्थनात भारतीय-अमेरिकन नागरिकांनी कॅलिफोर्नियामध्ये ‘गेट आउट दि वोट’ रॅली आयोजित केली होती. उद्योजक दाम्पत्य अजय आणि विनीता भूटोरिया यांच्या या रॅलीत प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अशोक भट्ट यांनी महटले की, भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सध्याच्या आणि भावी पीढीसाठी आणि अमेरिकेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिडेन-हॅरिस यांना वोट देणे खुप जरूरी आहे.
भारताशी चांगल्या संबंधासाठी ट्रम्प यांना मत द्या
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारताचे चांगले मित्र सांगत, भारतीय-अमेकिन असलेल्या एका विशिष्ट गटाने देशभरातील भारतीय वंशाच्या लोकांना रिपब्लिकन नेत्यांना वोट देण्याची विनंती केली आहे. ट्रम्प व्हिक्ट्री इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीचे सह-अध्यक्ष अल मेसन यांनी म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच भारतीय वंशाचा समाज एकत्र झाला आहे.
ट्विटरने ट्रम्प यांचे सल्लागाराची पोस्ट हटवली
ट्विटरने राष्ट्रपती ट्रम्प यांचे सल्लागार स्कॉट एटलस यांची एक पोस्ट केवळ यासाठी हटवली, कारण त्यांनी मास्क उपयोगी नसल्याचे म्हटले होते. एटलस यांनी ट्विट केले होते की, मास्कचा उपयोग होत नाही आणि तो जास्त वापरूनही उपयोग होत नाही. ट्विटरने या ट्विटला आपल्या भूमिकेचे उल्लंघन म्हटले आहे आणि अशा माहितीमुळे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली आहे.