चीनी व्हायरसला जगात पसरविल्याप्रकरणी चीनला दोषी ठरवलं पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं

संयुक्त राष्ट्र : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले की, चीनी व्हायरसच्या महामारीला नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याने संयुक्त राष्ट्राने चीनला जबाबदार ठरवले पाहिजे. कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण जगात जवळपास दहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये दोन लाख अमेरिकन नागरिक आहेत.

ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75व्या सत्रासाठी एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, दुसर्‍या महायुद्धाचा शेवट आणि संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेच्या 75 वर्षानंतर, आपण पुन्हा एकदा एका मोठ्या जागतिक युद्धात सापडलो आहोत. आम्ही अदृश्य शत्रू – चीनी व्हायरसविरूद्ध एक भयंकर युद्धा छेडले आहे, ज्याने 188 देशांमध्ये लाखो लोकांचा जीव घेतला आहे.

ट्रम्प यांनी मागणी केली की, जेथून कोरोना व्हायरस समोर आला आहे, त्यास नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे. ते म्हणाले, जसे की आपण उज्ज्वल भविष्याचा विचार करतो, आपल्याला त्या राष्ट्राला जबाबदार ठरवले पाहिजे, ज्याने ही महामारी जगभरात पसरवली.

ट्रम्प यांनी म्हटले की, चीनने त्यांच्या देशात (अमेरिका) त्यांच्या प्रवास प्रतिबंधावर टिका केली, मात्र त्यांनी (चीन) स्थानिक उड्डाणे रद्द केली आणि नागरिकांना त्यांच्या घरात बंद केले. व्हायरसच्या सुरूवातीच्या दिवसात चीनने स्थानिक उड्डाणे बंद केली होती, पण इतर ÷उड्डाणांना चीनच्या बाहेर जाण्यास आणि जगाला संक्रमित करण्याची परवानगी दिली.

ट्रम्प म्हणाले, चीनी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने ही चुकीची घोषणा केली की, हा संसर्ग मानवातून मानवाकडे पसरण्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ते म्हणाले, अमेरिका वॅक्सीनचे वितरण करेल आणि ही महामारी नष्ट करेल.