Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटादरम्यान रशियानं केला मदतीचा हात पुढं, ट्रम्प म्हणाले – ‘पुतिन यांची ऑफर शानदार’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला असून याचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकेत दिसून येत आहे. जगात सर्वात शक्तिशाली देशात तब्बल २ लाख पेक्षा जास्त लोकं कोरोनाने संक्रमित आहेत. आता अमेरिकेच्या मदतीसाठी रशियाने हात पुढे केला आहे, ज्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतीन यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या महासंकटा दरम्यान ३० मार्चला अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रपतींचे फोनवर बोलणे झाले. यानंतर शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली आणि म्हटले की, व्लादिमिर यांनी मदतीची एक उत्तम ऑफर दिली असून त्यात ते अमेरिकेला वैद्यकीय सुविधा पाठवणार आहेत.

रशियाने अमेरिकेला ऑफर दिली होती की, वैद्यकीय पुरवठा, व्हेंटीलेटर्स आणि पर्सनल प्रोटेक्शन किट देऊ शकतात. पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी म्हटले की, ‘व्लादिमिर पुतीन यांनी उत्तम ऑफर दिली. त्यांना वैद्यकीय सुविधा असलेला एक पूर्ण प्लॅन पाठवायचा आहे. ज्यावर मी म्हटले कि आम्हाला हे मान्य आहे.’

जेव्हा ट्रम्प यांना विचारले गेले की, काय हा रशियाचा प्रोपोगंडा आहे, त्यावर ते म्हणाले कि असे अजिबात नाही. ही केवळ मदत आहे जी हजारो लोकांना वाचवू शकते आणि यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाच्या संबंधां दरम्यान अमेरिकेत निवडणूकीतील घोटाळे करण्याच्या आरोपासह अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनाच्या संक्रमितांची संख्या वाढत चालली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसातच ३० दिवसांसाठी नो वर्क पिरियड वाढवला आहे. ज्यात लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले गेले आहे. पण ट्रम्प प्रशासनाने अधिकृतपणे लॉकडाऊन लागू केलेले नाही, ज्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे.