डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या राजांना धमकावले

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था

अमेरिकन सैन्य दलाच्या सहकार्याशिवाय सौदीचे राजे शाह आपल्या पदावर दोन आठवडेही राहू शकणार नाहीत, असा इशारा देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलाच्या वाढत असलेल्या किंमतीवरुन सौदी अरेबियाचे राजे शाह यांना धमकावले आहे. पश्चिम आशियातील अमेरिकेचा जवळचा सहकारी देश अशी सौदी अरेबियाची ओळख असली तरी वाढत्या इंधन दरामुळे अमेरिकेने सोदी अरेबियावर दबाव आणला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4154680-c787-11e8-bc62-23c3a2c5fed4′]

ट्रम्प म्हणाले की, आम्ही सौदी अरेबियाचे रक्षण करतो. तुम्ही त्यांना श्रीमंत म्हणाला का? मला शाह सलमान आवडतात, पण मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सुरक्षा देत आहोत. आमच्याशिवाय कदाचित तुम्ही दोन आठवडेही या पदावर राहू शकत नाही. तुम्हाला सैन्यदलासाठी पैसे द्यावे लागतील. परंतु, ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचे ८२ वर्षीय शाह यांच्यासमोर हे वक्तव्य कधी केले हे स्पष्ट केले नाही. दरम्यान, सौदी अरेबिया गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण तेलाच्या वाढत्या किमती त्यांच्या आड येत आहेत. चार वर्षांतील ही सर्वाधिक किंमत आहे.

धक्कादायक… मिरचीची धुरी देऊन मुलीसोबत वडील व इतरांनी केले लैंगिक अत्याचार

कच्च्या तेलाचे दर हे चार वर्षांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. तेल उत्पादक देशाची संघटना असलेल्या ओपेक आणि सौदी अरेबियाला ट्रम्प हे वारंवार या किमती कमी करण्यास सांगत आहेत. जागतिक उत्पादन आधीच वाढले आहे आणि इराणच्या तेल उद्योगावर ट्रम्प यांनी घातलेल्या निर्बंधाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे इंधनाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत जातील, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सहयोगी देशांना दीर्घ काळापासून देण्यात येत असलेल्या सैन्य मदतीवर तिखट शब्दांत टीका केली होती. या नव्या वक्तव्यामुळे ट्रम्प हे पुन्हा आपल्या जुन्या भूमिकेकडे वळताना दिसत आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4154680-c787-11e8-bc62-23c3a2c5fed4′]