आपलं स्वतःचं सोशल मिडीया प्लॅटफार्म सुरू करणार डोनाल्ड ट्रम्प, बॅन केल्याप्रकरणी उत्तर देणार ट्विटर अन् फेसबुकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर परत येण्याची तयारी करत आहेत. पण यावेळी ते त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. ट्रम्पचे जुने सल्लागार आणि प्रवक्ते जेसन मिलर यांनी ट्रम्प यांच्या सोशल मीडियावर परत येण्याची माहिती दिली. मिलर म्हणाले की, ट्रम्प येत्या दोन-तीन महिन्यांत सोशल मीडियावर परत येऊ शकतात. अशा परिस्थितीत ते म्हणाले की, सोशल मीडियावर परत येण्याचे हे व्यासपीठही ट्रम्प यांचेच असेल. मिलर म्हणाले की, ट्रम्प यांचे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आगामी काळात गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल.

दरम्यान, मिलरने या प्रकरणात पुढील कोणतीही माहिती दिली नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर उपस्थित नाहीत. 6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांच्यावर अमेरिकन कॅपिटलवर हिंसा भडकवण्याचा आरोप होता. त्यानंतर ट्विटर आणि फेसबुकने त्याचे अकाउंट कायमचे सस्पेंन्ड केले. अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिस अधिकाऱ्यांसह पाच जण ठार झाले.

निलंबित करण्यापूर्वी ट्विटरने ब्लॉक केले होते खाते
जानेवारीत हिंसा भडकल्यानंतर ट्विटरने ट्रम्पचे खाते 12 तासांसाठी ब्लॉक केले. ज्यासह त्यांच्या खात्यावर शेअर केलेला एक व्हिडिओ आणि इतर दोन ट्विट हटविण्यात आले. पण नंतर त्याचे खाते कायमचे निलंबित करण्यात आले. त्याच वेळी, त्यांच्या समर्थकांनी या प्रकरणात बराच गोंधळ उडविला. समर्थकांनी म्हंटले की, त्यांना गप्प बसविता येणार नाही.