ट्रम्प आपल्या 4 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजारांहून अधिक वेळा खोटं बोलले

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजारांहून अधिक वेळा खोटं बोलल्याचे समोर आले आहे. फॅक्ट चेक वेबसाईट पॉलिटीफॅक्टने सांगितल्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ पासून आजवर केलेल्या विधानांपैकी अनेक विधाने खोटी होती. ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या खोट्या विधानांची संख्या सतत वाढत गेल्याचे, वॉशिंग्टन पोस्टने म्हटले. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्वांत मजबूत अर्थव्यवस्था केल्याचा दावा (४०७ वेळा)

आपल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी ४०७ वेळा अर्थव्यवस्था आणखी मजबूत केल्याचा दावा केला. मात्र, ट्रम्प यांच्यापेक्षा आयझनहावर, लिंडन बी जॉन्सन आणि क्लिंटन यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची आर्थिक व्यवस्था अधिक भक्कम होती.

मेक्सिको सीमेवर भिंत बांधल्याचा दावा (२६२ वेळा)

आपल्या राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करण्यासाठी निवडून आल्यापासून ट्रम्प यांनी बेकायदेशीररित्या होणारी घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर मोठी भिंत बांधण्याची घोषणा केली होती. लवकरच भिंत बांधण्याचे काम पूर्णत्वास जाईल, असा दावा त्यांनी सतत केला. काँक्रीटची एक भिंत बांधण्याचे काम सुरू होते. पण पूर्वीपासून असलेल्या कुंपणाच्या भागास वाढवण्यासाठी हे काम करण्यात आले.

रशियासोबत संगनमत नसल्याचा दावा (२३६ वेळा)

२०१६ मधील निवडणुकीत ट्रम्प यांनी रशियासोबत सांगणार नसल्याचे सांगत होते. पण मुलर रिपोर्टनुसार, ट्रम्प यांना विजय मिळवून देण्याकरता त्यांच्या रशियन सहकाऱ्यांनी हिलरी क्लिंटन यांना बदनाम करण्याचा कट रचला असल्याचे सांगितलं आहे.