भारत दौर्‍यापुर्वी नवा ‘लूक’ ! जेव्हा प्रभासच्या जागी बाहुबलीत दिसले ‘डोनाल्ड ट्रम्प’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा काही तासांचा कालावधी राहिला आहे . ट्रम्प यांनी स्वत: एक मजेशीर व्हिडिओ ट्वीट केला आहे. ट्रम्प हे भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बाहुबली चित्रपटाचा मिम तयार करत ट्रम्प हे स्वत: बाहुबलीच्या भुमिकेत दिसत आहेत. पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई कुशनर हे देखील या व्हिडिओ मध्ये आहेत.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प हे आपल्या परिवारासह भारतात येणार आहेत. अहमदाबादपासून ते आग्र्यापर्यंतचा त्यांचा दौरा खास बनवण्यासाठी तयारीमध्ये कोणतीच कमतरता राहू नये याची खबरदारी घेतली जातेय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळात त्यांची मुलगी इव्हांका, जावई जारेड कुशनर आणि उच्च अमेरिकी अधिकारी यांचे पथक असणार आहे. पत्नी मेलानिया ट्रम्प ह्या देखील २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ट्रम्प सोबत असणार आहेत. याचबरोबर अर्थमंत्री स्टीव्हन मुनुचिन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन , वाणिज्यमंत्री बिल्बर रॉस, आणि ऊर्जामंत्री डॅन ब्रुलीएटे यांचा समावेश आहे.

ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 25 फेब्रुवारी रोजी संरक्षण आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर हाउस्टनमध्ये झालेल्या हॉडी मोदी कार्यक्रमासारखा अहमदाबादमधील नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम असणार आहे. दुपारचे जेवण रामनाथ कोविंद हे ट्रम्प सोबत करणार आहेत.

अमेरिका आणि भारत या भेटीत व्यापार कराराला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या दौऱ्यात काही संरक्षण करारही होऊ शकतात. भारत आणि अमेरिका दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा निर्णय घेतील. अशी सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार समजले आहे .