US Election 2020 : डिबेटमध्ये ‘कोरोना’वर घेरल्याने ट्रम्प यांनी भारतावर केला आकडे लपवण्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिकेतील निवडणुकांची सुरूवात झाली असून आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी अमेरिकन निवडणुकीचे पहिले प्रेसिडेंशियल डिबेट झाले, जेथे डोनाल्ड ट्रम्प (donald trump) आणि जो बिडेन (joe biden) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या दरम्यान कोरोना संकटावरून जो बिडेन(joe biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (donald trum) यांच्यावर आरोप करताना म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या ड्यूटीत फेल झाले आहेत.

भारतावर केला आकडे लपवण्याचा आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात आरोप केला की, भारत, चीन आणि रशियासारखे देश आपल्या येथील खरे आकडे देत नाहीत. तुम्ही सांगू शकत नाही की, तिथे किती लोक मेले आणि किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांचे आकडे खरे नाहीत.

यापूर्वी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा टेस्टींगच्या बाबतीत अमेरिकेची तुलना भारताशी केली आहे. ट्रम्प यांनी या पूर्वी भारतात कोरानाने होणारे मृत्यू आणि टेस्टींगच्या आकड्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

यादरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर दिले की, कोरोना व्हायरस चीनमुळे आला, जर चीनने सर्वांना योग्यपद्धतीने सर्व सांगितले असते तर कोरोना पसरला नसता.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर जो बिडेन सरकारमध्ये असते तर केवळ दोन लाख नाही तर दहा लाख लोक मेले असते. लवकरात लवकर वॅक्सीन बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमेरिकेत कोरोना संकट सध्या निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा आहे. विरोधकांचा आरोप आहे की, डोनाल्ड ट्रम्प ही महामारी नियंत्रणात ठेवू शकले नाहीत.

अनेक मुद्द्यांवर ट्रम्प-बिडेन आमने-सामने
बिडेन यांच्याकडून डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अर्थव्यवस्था बंद करण्याचा आरोप करण्यात आला, सोबतच वॅक्सीनबाबत खोटे दावे केल्याचा आरोप करण्यात आला.

अमेरिकन निवडणुकीतील हे पहिले प्रेसिडेन्शियल डिबेट आहे. पहिल्या डिबेटमध्ये सुप्रीम कोर्ट, डोनाल्ड ट्रम्प यांचा रेकॉर्ड आणि सुप्रीम कोर्टप्रकरणावर चर्चा झाली. यादरम्यान एकमेकांवर जोरदार आरोप करण्यात आले.

दोन्ही उमेदवार अनेक मुद्द्यांवर एकमेकांना भिडले. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बिडेन यांच्यावर आरोप केला की, त्यांच्याकडे कोणताही प्लॅन नाही आणि तुमच्या येण्याने काहीही होणार नाही. मी चार वर्षासाठी राष्ट्राध्यक्ष बनलो आहे आणि पुढेही राहीन. दुसरीकडे जो बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची चुकीची वक्तव्य, डॉक्टरांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला.