अमेरिका : दंगल आणि निदर्शनांच्या वेळी ‘व्हाइट हाऊस’मध्ये का अंडरग्राऊंड झाले ट्रम्प ?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा टीम काही वेळासाठी त्यांना व्हाइट हाऊसमधील अंडरग्राऊंड बंकरमध्ये घेऊन गेली. ही त्यावेळची घटना आहे, जेव्हा शुक्रवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवास्थान असलेल्या व्हाइट हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते आणि ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने करत होते. त्यांचे सुरक्षा पथके ही निदर्शने पाहून हैराण झाली होती आणि यांनतर त्यांना त्या बंकरमध्ये नेण्यात आले, जो मोठ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. न्यूयॉर्क टाइम्सने ही माहिती दिली आहे.

निदर्शने पाहून सुरक्षा पथकाला बसला धक्का
व्हाइट हाऊसच्या बंकरमध्ये ट्रम्प एक तासापेक्षा सुद्धा कमी वेळासाठी होते. शुक्रवारी व्हाइट हाऊसच्या बाहेर शेकडो आंदोलनकर्ते जमले होते. यादरम्यान सीक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट पार्क पोलिसच्या अधिकार्‍यांना त्यांना रोखण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागले. ट्रम्प यांची टीम एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांना व्हाइट हाऊसच्या बाहेर पाहून हैरान झाली होती. अजून हे स्पष्ट झालेले नाही की, या दरम्यान ट्रम्प यांची पत्नी मेलानिया आणि मुलगा बैरनसुद्धा बंकरमध्ये त्यांच्या सोबत गेले होते का.

रविवारपासून अमेरिकेच्या 40 शहरांसह वॉशिंग्टन डीसीमध्ये सुद्धा कर्फ्यू लावण्यात आला आहे. देशात अश्वेत नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांचा पोलीसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार 40 शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे आणि 5,000 नॅशनल गार्डस मेंबर्सना 15 राज्य आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये 2,000 अतिरिक्त जवान तयार ठेवले आहेत. 25 मे रोजीपासूनच देशात निदर्शनांची ही स्थिती कायम आहे. 46 वर्षांचा अफ्रिकन युवक जॉर्ज फ्लॉयडचा मिनिपोलिसमध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.