PM मोदींच्या पावलावर पाऊल टाकतायेत डोनाल्ड ट्रम्प, चीनी अ‍ॅप TikTok वर घालणार बंदी !

नवी दिल्ली. वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला की त्यांचे प्रशासन सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन टिकटॉकवर बंदी घालण्याच्या योजना आणि पर्यायांवर विचार करीत आहे.

ट्रम्प म्हणाले, आम्ही टिकटॉककडे पाहत आहोत, आम्ही टिकटॉकवर बंदी घालू शकतो, आम्ही इतर काही गोष्टी करु शकतो, काही पर्याय आहेत पण बर्‍याच गोष्टी घडत आहेत म्हणून आम्ही पाहू की काय होऊ शकते, ते म्हणाले आम्ही टिकटॉकच्या संदर्भात बरेच पर्याय शोधत आहोत.

जुलैच्या सुरुवातीस अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ म्हणाले होते की, प्रशासन टिकटॉकवरील बंदीचा विचार करीत आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन मुनचिन यांनी या आठवड्याच्या सुरूवातीस सांगितले होते की प्रशासन टिकटॉक संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा घेत आहे आणि अर्थ विभागाच्या सल्ल्यानुसार येत्या काही दिवसांत कोणतीही संभाव्य कारवाई होऊ शकेल.