डोनाल्ड ट्रम्प यांचा गुजरात दौरा ! केवळ 3 तासांसाठी मोदी सरकार करणार 100 कोटींहून जास्त खर्च

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौर्‍यावर येणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा चर्चेचा विषय बनला आहे. 24 फेब्रुवारीला ते गुजरातला भेट देणार असून त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी गुजरात सरकार कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी राज्य सरकार 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार असल्याचे समजते आहे.

ट्रम्प यांचा तीन तासांचा अहमदाबाद दौरा –
24 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथे तीन तासांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या तीन तासांच्या भेटीसाठी आणि ट्रम्प यांच्या स्वागतासाठी राज्य सरकार 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्या स्वागतात बजेटची समस्या येता कामा नये, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती व शहरातील सुशोभीकरण सुरू –
अहमदाबाद महानगरपालिका आणि अहमदाबाद नगरविकास प्राधिकरण शहरातील रस्ते दुरुस्ती व सुशोभीकरण सातत्याने करीत आहेत. यासाठी एकूण 100 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात येणार आहेत. एका अहवालानुसार 17 रस्त्यांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी 60 कोटी बजेटचे वाटप करण्यात आले आहे. हाच तोच 1.5 किमी रस्ता आहे जो विमानतळावरून थेट मोटेरा स्टेडियमकडे जाईल. या रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी 6 कोटींचे बजेट खर्च करण्यात आले गेले आहे. विकास प्राधिकरण रस्त्यांसाठी 20 कोटी बजेट खर्च करत आहे.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी केंद्र सरकारही खर्च करत आहे, पण त्यातील मोठा भाग राज्य सरकार खर्च करत आहे. सर्व प्रकारच्या लॉजिस्टिक आणि प्रशासनाची कामे वेळेपूर्वी करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत जेणेकरुन कोणत्याही प्रकारची उशीर होऊ नये.

You might also like