भारतीयांना खुश करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केला Video, PM मोदींचा देखील समावेश

पोलिसनामा ऑनलाइन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 लाखांहून अधिक भारतीय-अमेरिकन लोकांना खूश करण्याच्या उद्देशाने पहिला व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद मधील ऐतिहासिक भाषणाची क्लिप भारतीयांना खूश करण्यासाठी समावेश केली आहे.

व्हिडिओत मोदी-ट्रम्प यांचे हातात हात असल्याचे दिसून आले आहे

हा व्हिडिओ फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्डच्या भारत दौर्‍याचा आहे. या दौर्‍यामध्ये ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनरसह अहमदाबादला भेट दिली. या दौर्‍यात ट्रम्प प्रशासनाचे मोठे अधिकारीही त्यांच्यासोबत आले होते. अहमदाबादमध्ये ट्रम्प यांनी विशाल रैलीला संबोधित केले होते.

भारतीय-अमेरिकन लोकांना मोठा पाठिंबा मिळत आहे

हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना ट्रम्प ​विक्ट्री फाइनेंस कमेटीची अध्यक्ष किंबरले गिलफोयले म्हणाली की, अमेरिकेला भारताशी संबंध खूप आवडतात. आम्हाला भारतीय-अमेरिकन लोकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

ट्विटरवर 66 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला

या मोहिमेचे नेतृत्व करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर भारतीय-अमेरिकन समुदायाशी चांगला संपर्क साधत आहेत. जूनियर ट्रम्पने हा कमर्शियल व्हिडिओ रीट्वीट केला आणि काही तासांतच व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही तासांत ट्विटरवर 66 हजार लोकांनी पाहिला.

व्हिडिओ 107 सेकंदाचा आहे आणि त्याला ‘चार साल और’ असे शीर्षक देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि मोदी हातात हात घेऊन चालताना दाखवले आहे. यात ह्यूस्टनमधील पंतप्रधान मोदींच्या एनआरजी स्टेडियमच्या दृश्याचा समावेश आहे.