डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर ‘निशाणा’, म्हणाले – ‘इंडियातील घाण अमेरिकेत येत आहे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत, चीन आणि रुसची घाण आता लॉस अँजिलिस पर्यंत येऊन पोहचली असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. इकनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्क मध्ये लोकांना संबोधित करताना ते बोलत होते. आपल्या देशाचे क्षेत्र कमी आहे मात्र चीन, भारत आणि रुस सारखे देश मोठे असल्यामुळे यांना सफाई आणि वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत त्यामुळे हे देश आपली सर्व घाण समुद्रात टाकत आहेत आणि ही घाण वाहत थेट लॉस अँजिलिस पर्यंत येत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

समुद्रामध्ये होणारी घाण आता थेट न्यूयॉर्क पर्यंत येत असल्याचे ट्रम्प यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. समुद्रातील पाण्याद्वारे प्लास्टिक, केमिकल अवशेष सहित अनेक प्रकारची घाण पोहचत आहे. मात्र अनेक तज्ञांचे म्हणणे हे आहे की ही सर्व घाण भारतावरून येत नसून चीन, व्हियेतनाम, इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपिन्स वरून पोहचत आहे कारण जीपीजीपीचा प्राथमिक स्रोत हा भारत नाही.

ट्रम्प अमेरिकेला छोटा देश म्हणतात परंतु जगातील हा चौथा मोठा देश आहे, जो की भारतापेक्षा चार पट मोठा आहे.

आधी देखील भारतावर केले आहे वक्तव्य
डोनाल्ड ट्रम्प यांनी जूनमध्ये प्रदूषणावरून भारताला घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. त्यावेळी ट्रम्प असे म्हणाले होते की, भारत, चीन आणि रुस सारख्या देशात चांगली हवा आणि पाणी देखील नाही. जागतिक पर्यावरणाचा विचार करता हे देश आपली जबाबदारी नीट पार पाडत नाहीत आणि याची त्यांना जाणीव देखील नाही. या देशांमध्ये प्रदूषण आणि स्वच्छतेबाबत कोणताच विचार केला जात नाही अशा प्रकारची वक्तव्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ब्रिटिश चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

ट्रम्प म्हणाले होते, अमेरिका जगातील सर्व देशांपैकी सर्वात स्वच्छ देश आहे.तसेच भारतासोबत अन्य देशामध्ये स्वच्छ हवा देखील नाही, ना स्वच्छ पाणी आहे. अशी अनेक शहरे या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी तुम्ही मोकळा श्वास देखील घेऊ शकत नाहीत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like