कलियुगातील पुण्यदान ! डोळे, फुफूस, ह्दय, यकृत, किडनी केली दान; गरिब कुटुंबाचा समाजापुढे आदर्श

पोलीसनामा ऑनलाईनः अन्नाच, कपड्याचे दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांच दान होऊ शकते आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र, बेल्हा येथील एका कुटुंबाने मुलाच्या मृत्यूनंतर चक्क त्याचे अवयव दान करत समाजापुढे आदर्श निर्मण केला आहे. डोळे, फुफूस, ह्दय,यकृत, किडनी गरजुंना दान करत या कुटुंबाने चार जणांना जिवदान देत अवयव दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.

संतोष धोंडिभाऊ बांगर (वय 43) असे या दानशुर मजुराचे नाव आहे. बेल्हा (ता.जुन्नर) येथील एका बांधकाम व्यवसायिकाकडे संतोष हा मजुर म्हणून काम करत होता. काम करत असतांना एका लाकडी परातीच्या फळीवरुन त्याचा पाय घसरला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्ग्णालयात दाखल केले. परंतु दोनच दिवसात उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे छत्र हरवले.

संतोषला वडील नाहीत वृद्ध आई,पत्नी व एक  7 व्या इयत्तेत शिकत असलेला मुलगा आहे. फक्त 11 गुंठेच जमिन. त्यात एक लहान भाऊ सगळ काही मजुरीवरच चालत असे. त्यात कमावता गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला अशाही परिस्थितीत स्वतःचे डोंगराएवढे दुःख बाजुला त्यांनी ठेवले. या अशिक्षित मजुराच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळ डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन जानकू डावखर,बबन औटी, विकास बढे यांनी केले आहे. संतोषच्या दशक्रिया विधीच्या वेळी ब्राम्हण, नाभिक समाज, प्रवचनकार, स्पिकरव्यवस्था या सर्वांनी निशुल्क सेवा देऊन स्वतः रोख मदतही दिली.