अबब… करवीर निवासिनी अंबाबाई चरणी ‘एवढे’ दान

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – करवीर निवासिनी अंबाबाई चरणी २ कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. नवरात्रोत्सव आणि लागूनच आलेली दीपावलीच्या सुट्टीमधील सण-उत्सवाच्या काळात भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केलेले हे दान आहे. यामध्ये ३८ लाख रुपयांच्या देणग्या, ९३ लाखांची रोकड तसेच ३३ लाखांच्या सोने-चांदी दागिन्यांचा समावेश आहे. मागच्या वर्षी देवीला याच काळात दीड कोटींचे दान मिळाले होते. त्या तुलनेत यंदा ५० लाख जास्त दान मिळाले असून, यामध्ये दिवाळीत मिळालेल्या ३२ लाखांच्या सोन्याच्या किरीटाचाही समावेश आहे.

अंबाजोगाई पोलिसांसमोर बिबट्याची परेड…

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी शारदीय नवरात्रोत्सव, सुट्ट्यांच्या काळात देशभरातील लाखो भाविक कोल्हापूरात येतात. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अंबाबाई चरणी भाविकांकडून दान देण्यामध्येही वाढ होत आहे. यंदाही रोकड, विविध प्रकारचे दान, सोने-चांदी दागिने आणि पेट्यांमधील उत्पन्न मिळून अंबाबाईच्या चरणी २ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी नवरात्रोत्सव आणि दीपावली सुट्ट्यांच्या काळात १.५ कोटी रुपयांचे दान अंबाबाई चरणी जमा झाले होते. या वर्षी यामध्ये ५० लाखांची वाढ होऊन दोन कोटी रुपयांचे दान देवस्थान समितीच्या खजिन्यात जमा झाले आहे. अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून देवीला अभिषेक सेवा, शाश्वत पूजा, महाप्रसाद देणगी अशा नित्य सेवेतूनही दान अर्पण केले जाते. यंदाच्या नवरात्रोत्सव काळात या नित्यसेवेतून ३८ लाख रुपये जमा झाले आहेत.