चिंचवड देवस्थानच्या वतीने ससून रुग्णालयास 21 लाखाची देणगी

लोणी काळभोर (पोलिसनामा) कोरोना संसर्गाच्या लढाईत अनेकांनी आपापल्या परीने आर्थीक स्वरूपात शासनाला मदत केली असून भूकेलेल्या गोरगरीबांना दोन वेळचे जेवन पुरविले जात आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने ससून रुग्णालयास वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी व उपकरणे घेण्यासाठी एकवीस लाख रुपयाची मदत दिली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम देवस्थान कडून महाराष्ट्र शासनाकडे आर्थीक मदत दिली जात आहे. सध्या अतिशय अडचणीचा काळ असून प्रत्येक जण आपापल्या परीने या राष्ट्रीय कार्यात सहभागी होतो आहे कोणी व्यक्तीगत तर कोणी समूहाच्या माध्यमातून मदतीसाठी पुढे येत आहे.

सह धर्मादाय आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळींनी एकमुखी ठराव घेऊन हा धनादेश ससून हाॅस्पिटल देणगी समिती यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार उपस्थित होते.