दिलदार ’टाटा’ ! ‘कोरोना’ काळातही कर्मचार्‍यांसाठी केला कोट्यवधींचा बोनस जाहीर

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 16 : भारतील नामवंत आणि प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे कर्मचर्‍याविषयी असणारे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. म्हणून टाटांना मोठ्या मनाचे आणि दिलदार म्हणूनही ओळखले जात आहे. त्यामुळे उद्योजक रतन टाटा यांच्यावर कोट्यवधी भारतीय प्रेम करतात. यंदा टाटांनी कोरोना काळातही कर्मचार्‍यांसाठी कोट्यावधींचा बोनस जाहीर केला आहे.

टाटा हे भारतावर आणि भारतीय नागरिकांवर किती प्रेम करतात हे सांगायला नको. आपल्या कंपनीतील कर्मचार्‍यांची अगदी कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात. कोरोना काळातही टाटा यांच्या या दानशूर स्वभावाचा देशावासीयांनी अनुभवलाय. कोरोना काळात टाटा कंपनीने लॉकडाऊनमध्येही कर्मचार्‍यांना पगार दिला. तसेच आता, कंपनीतील कर्मचार्‍यांनासाठी दिवाळी बोनसही जाहीर केलाय.

‘देश का नमक टाटा नमक’ म्हणत उदयोजक रतन टाटा यांच्या दानशूरपणाचे नेटीझन्सने कौतुक केले आहे. रतन टाटा यांनी लॉकडाऊन काळात पंतप्रधान सहाय्यता निधीला सुमारे 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. विशेष म्हणजे, कोविड योद्धा बनून रुग्णलयात काम करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचार्‍यांसाठी त्यांनी आपलं ताज हॉटेलही खुलं केलं. रुग्णालयात याच हॉटेलमधून दररोज जेवणाचे डबेही पुरविले.

देशावरील प्रत्येक संकट हे आपली जबाबदारी बनून रतन टाटा काम करत आहेत. त्यांच्या कामातून टाटांबद्दलचा हा आदर नेहमी वाढताना दिसतोय. कोरोना लॉकडाऊनमध्ये कर्मचार्‍यांना पगार दिल्यानंतर आता बोनसही टाटा कंपनीकडून जाहीर केलाय. त्यामुळे, कोरोनाच्या काळातही कर्मचार्‍यांची दिवाळी साजरी होणार, यात काही शंका नाही.

टाटा स्टीलने सोमवारी 235.54 कोटी रुपये बोनस म्हणून वाटले जाणार आहे, असे जाहीर केले. ही रक्कम 24 हजार 74 कर्मचार्‍यांमध्ये वाटली जाणार आहे, जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या 12 हजार 807 कर्मचार्‍यांना 142.05 कोटी रुपये मिळणार आहेत. तर बाकीचे 93.49 कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या 11 हजार 267 कर्मचार्‍यांमध्ये वाटले जाणार आहेत.

ग्रेट रिव्हिजननुसार वाढलेला बेसिक, डीए आणि 18 महिन्यातील अनुशेष यामुळे यंदा बोनसची रक्कम अधिक असणार आहे. मागील वर्षी 15.6 टक्के बोनस मिळाला होता. तर, यंदा तो 12.9 टक्के म्हणजे 2.7 टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी बोनसची अधिक रक्कम 2.36 लाख इतकी होती तर, यंदा ती 3.01 लाख इतकी आहे.

कर्मचारी कपात करणार्‍या ‘या’ कंपन्यांबद्दल नाराजी
कोरोना काळात लॉकडाऊन झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केलीय. छोट्या-मोठ्या खासगी नाही तर एअर इंडियाने देखील पाच वर्षे कर्मचार्‍यांना बिनपगारी घरी बसविण्याचा निर्णय घेतलाय. या सर्व कर्मचारी कपातीवर टाटा समूहाचे रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या कंपन्यांना सुनावले आहे. टाटा यांनी एका न्यूज वेबसाईट मुलाखती दिली. यात पहिल्यांदा त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. कोरोना काळात कंपन्यांमधून अनेक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाताहेत. यावरून असे वाटत आहे की, कंपन्यांच्या मुख्य नेतृत्वाकडे सहानुभूतीची कमतरता झालीय. ज्या लोकांनी त्यांचे पूर्ण करिअर कंपनीसाठी खर्ची घातले त्या लोकांना पाठिंबा देण्याऐवजी बेरोजगार केले जात आहे, असा आरोप देखील रतन टाटा यांनी केला आहे.