‘असं’ फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं, गाढवांच्या बाजारात ‘बाँम्ब’ आणि ‘AK-47’ची ‘विक्री’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानला सध्या प्रचंड प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच सध्या तिथे एक गाढवांची जत्रा भरली असून ही जत्रा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यातील सर्वात मनोरंजक बाब म्हणजे या गाढवांची नावे धोकादायक बॉम्ब आणि हिंदू मुस्लिमांच्या अनेक प्रसिद्ध नावांवरून ठेवण्यात आली आहेत.

वास्तविक, पाकिस्तानमधील ही जत्रा पाकिस्तानच्या हैदराबाद शहरापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या बदिन जिल्ह्यात भरली आहे. दरवर्षी गाढवांचा हा मेळावा पाकिस्तानमध्ये भरतो. या जत्रेत भाग घेण्यासाठी कराची, बदिनसह पाकिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमधून व्यापारी दाखल झाले आहेत. येथे गाढवे विकत आणि खरेदी करीत आहेत.

अशी आहेत गाढवांची मजेशीर नावे :
जत्रेत विकल्या गेलेल्या गाढवांची नावे एके-४७, रॉकेट लाँचर, अणुबॉम्ब अशी आहेत. इतकेच नाही तर काही गाढवांची नावे माधुरी, शीला आणि दिल अशी आहेत. जत्रेत पोहोचलेल्या लोकांना गाढवांची नावे आकर्षित करीत आहेत.

या गाढवांचे रंग देखील भिन्न आहेत. काही पांढरे आहेत, काही राखाडी आहेत तर काही तपकिरी आणि काळी गाढवे आहेत. याशिवाय मादी गाढवेही विकली जात आहेत. ही सर्व गाढवे लासी, लारी, इराणी आणि थारी प्रजातीची असल्याचे म्हटले जाते.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार या गाढवांची किंमत २०,०० रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र गाढवांना जास्त किंमत असल्याने या वेळी खरेदीदारांची संख्या घटली आहे. ही जत्रा गेल्या ७० वर्षांपासून चालू आहे.

म्हणून चीनमध्ये गाढवांना मागणी :
पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या मोठी आहे. पाकिस्तानची बरीच गाढवे चीनमध्ये निर्यात केली जातात, गाढवांपासून चीनमध्ये पारंपारिक औषधे तयार केली जातात. रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्त वाढीसाठीची औषधे गाढवाच्या त्वचेपासून बनविली जातात.याशिवाय चीनमध्ये गाढवाच्या मांसालाही मोठी मागणी आहे. गाढवांच्या संख्येमध्ये चीन प्रथम क्रमांकावर आहे, परंतु प्रचंड मागणी व उत्पादन असूनही चीनला गेल्या अनेक वर्षांपासून गाढवांसाठी पाकिस्तानकडे जावे लागत आहे. एवढेच नव्हे तर चीन गाढवांच्या विकासासाठी पाकिस्तानात गुंतवणूकही करणार आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चीन गाढवांच्या प्रजननासाठी गुंतवणूक करेल. येथे गाढव विकास केंद्र बांधले जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like