लग्नात ‘गाढवां’ना रंगवून बनवले ‘झेब्रा’ ; प्रकार समजताच भडकले लोक

कॅन्डीज (स्पेन) : वृत्तसंस्था – स्पेनमध्ये सफारी थीम या संकल्पनेवर आधारीत एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न सोहळ्यात दोन गाढवांच्या अंगावर काळे पट्टे ओढून झेब्रा असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या लोकांनी आयोजकांना धारेवर धरले. लग्न सोहळ्यात दोन झेब्रा कमी पडल्याने गाढवांना रंग देऊन झेब्रा बनवल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. हा प्रकार स्पेनमधील कॅन्डीज शहरात घडला. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राण्यांना अशा प्रकारे क्रूर वागणूक दिल्याच्या विरोधात सोशल मीडियावर एक मोहीम सुरु केली असून आयोजकांनी केलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कॅन्डीज शहरातील एल पालमार येथे कार्य़क्रम स्थळाच्या बाहेर गवत चरताना दोन गाढवांचे चित्रीकरण करण्यात आले होते. या गाढवांना झेब्रा प्रमाणे रंगवण्यात आले होते. काही लोकांनी हा प्रकार लाजीरवाणा असल्याचे सांगून याची माहिती पशु अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली. या घटनेबाबात प्राणीमित्र एंजेल टॉमस याने गाढवांचे फोटो फेसबुक पेजवर अपलोड केले आहेत. या फोटोखाली पर्यटकांसाठी नामशेष होत असलेल्या गाढवांचे शोषण केले जात असल्याचे म्हटले आहे.

नागरिकांनी या प्रकाराची निंदा केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार कृषी आणि वाणिज्य कार्य़ालयाच्या लक्षात आणून देण्यात आला आहे. तसेच स्पेनची ‘प्रकृती संरक्षण सेवा’ ही संस्था या घटनेचा तपास करत आहे. अशा प्रकारची हि पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील एका प्राणीसंग्राहलयात अशा प्रकारची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like