नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनो घाबरू नका : प्रशासक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर अर्बन बँक डबघाईला आलेली नाही. बँकेची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. फक्त ‘एनपीए’ वाढल्यामुळे रिझर्व बँकेने प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली आहे, असे बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मिश्रा म्हणाले की, बँकेवर प्रशासक नियुक्त केले म्हणून ठेवीदारांनी अजिबात घाबरून जाऊ नये. बँकेची परिस्थिती चांगली आहे. ‘एनपीए’ वाढल्यामुळेच रिझर्व बँकेने काही दिवसांसाठी माझी नियुक्ती केलेली आहे. सर्व व्यवस्थित पार पडल्यानंतर बँकेचे संचालक मंडळ त्यांचा कारभार पाहील.

रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेवर प्रशासक नियुक्त केल्याने ठेवीदारांमध्ये घबराट पसरली होती. ठेवीदारांना ठेवी काढल्यास बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये. यासाठी प्रशासनाने प्रसारमाध्यमांना बँकेची परिस्थिती व्यवस्थित असल्याची माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त –