कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, धनंजय मुंडेंच्या कार्यालयनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे असा एक संदेश सर्वत्र फिरत आहे. मात्र, त्यावर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवु नका असे सांगण्यात आले आहे.

नेमकं काय सांगितलं आहे धंनजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून –
पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद