धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू, अन्यथा घरात येईल दारिद्रय

पोलिसनामा ऑनलाईन – दरवर्षी कार्तिकच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तारखेला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी सोने-चांदीच्या वस्तू विकत घेतल्या जातात, लोक नवीन वस्तू खरेदी करतात. परंतु खरेदीच्या वेळी या पाच वस्तू खरेदी करु नका, अन्यथा सुख, समृद्धी, संपत्ती सर्व घरातून संपेल आणि घरात दारिद्र्य येईल.

स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमः आजच्या काळात धनत्रयोदशीला वस्तू खरेदी करताना स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम वस्तू खरेदी करत नाहीत. कारण स्टील व अ‍ॅल्युमिनियमची भांडी किंवा इतर वस्तू विकत घेतल्यामुळे घरातील लक्ष्मी रागावेेल व घरात दारिद्र्य येईल. राहूचा अ‍ॅल्युमिनियमवर परिणाम होतो. या कारणास्तव, हे दुर्दैवी आणि दुर्दैवाचे सूचक मानले जाते.

लोह: ज्योतिषात लोहाला शनीचा घटक मानले जाते, म्हणून या शुभ दिवशी लोखंडी वस्तू घरात आणणे शुभ मानले जात नाही. असा विश्वास आहे की धनतेरसच्या दिवशी या धातूपासून बनवलेल्या वस्तू विकत घेतल्यास दारिद्रय येते.

प्लास्टिक – धनत्रयोदशी दिवशी प्लास्टिक वस्तू खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते कारण यामुळे टिकाऊपणा कमी होतो.

काच – हिंदू धर्मग्रंथांचा असा विश्वास आहे की धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काच किंवा काचेच्या वस्तू खरेदी करू नका, कारण काच देखील राहूचा घटक आहे, ज्यामुळे घरात दारिद्र्य येते.

साखर – साखरेपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे देखील या दिवशी अशुभ मानले जाते. साखर बराच काळ सुरक्षित आणि स्थिर नसल्यामुळे घरात बरकत कमी होते.