मोदींवर टीका करण्यापेक्षा मार्ग शोधा : योगगुरू रामदेवबाबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, महागाई अशा अनेक समस्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत बसू नका. यातून मार्ग शोधून दाखवा, असे आव्हान योगगुरु रामदेवबाबा यांनी मोदी विरोधकांना दिले आहे.

संगमनेर येथे गीता महोत्सवाला आज दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमास योगगुरू रामदेव बाबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती.

रामदेव बाबा म्हणाले की, समाजात चांगले नागरिक घडविण्याची क्षमता गीता संस्कारात आहे. त्यामुळे गीता परिवाराचा उपक्रम स्तुत्य आहे.

गीता परिवाराच्या वतीने स्वामी श्री. गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेर येथे ७१ हजार गीतेचे मुखोद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्त गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी या गीता महोत्सवाचे नियोजन केले आहे. यामहोत्सवात विविध ठिकाणाहून येणारे ८ राज्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परराज्यातून येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या निवास, जेवण आणि अगदी छोट्या, छोट्या गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com

You might also like