पोलिसांनी ‘डायरेक्ट’ पत्रव्यवहार करू नये, पोलीस महासंचालकाचा अधिकाऱ्यांना ‘आदेश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी खात्यातील कारभारात सुधारणा व पारदर्शपणा आणण्यासाठी विविध उपाय योजना राबवित आहेत. याचाच भाग म्हणून घटकप्रमुखांकडून येणाऱ्या पत्र व्यवहारामध्ये अचुकता आणण्यासाठी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक निर्णय घेतला आहे. थेटपणे पत्रव्यवहार न करता संबंधित वरिष्ठांच्यामर्फत पाठवायची आहेत. त्याशिवाय येणाऱ्या पत्रांची दखल घेतली जाणार नाही, असे पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.

राज्यभरातील विविध पोलीस घटकांकडून मुख्यालयात पाठविण्यात येणाऱ्या विविध स्वरुपाचे पत्रव्यवहार आणि अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. थेट संपर्क न साधता संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवायचा आहे. त्याशिवाय आलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्याची शक्यता असते. त्रिटी निदर्शनास आल्यास त्यांच्या स्तरावर त्यामध्ये बदल केले जाऊ शकतो.

संबंधीत वरिष्ठांकडून त्रटीमध्ये बदल केल्यानंतर मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जावू शकतात. त्यामुशे संबंधित विषयातील त्रुटी दूर होऊ शकतात, त्यामुळे पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलिसांना थेट पत्रव्यवहार करता येणार नाही.

Visit :  Policenama.com