‘फिटनेस चॅलेंज’ दोन तरुणींना पडले महागात, ‘स्क्वाट्स’ मारण्याचा नादात पोहचल्या ‘रुग्णालयात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काल लोक आपल्या फिटनेस बाबत अत्यंत सजग झाले आहेत, त्यामुळे अनेक जण रोज जिममध्ये जातात. तुम्ही देखील जिममध्ये जात असाल आणि फिटनेस चॅलेंज लावत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. चीनमध्ये दोन मुलींना फिटनेस चॅलेंज लावणे महागात पडले आहे, यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. चीनच्या चोंगकुइंग शहरात राहणाऱ्या १९ वर्षीय टँग आणि तिची सहकारीने स्क्वाट्स चॅलेंज घेतले. या चॅलेंज अंतर्गत त्यांना १ हजार स्क्वाट्स मारायच्या होत्या.

दोघींनी एक दुसरीला व्हिडिओ कॉल केला आणि एक सोबतच स्क्वाट्स मारण्यास सुरुवात केली. या दोन्ही मैत्रिणी आपले वजन कमी करण्याच्या विचारात होत्या. त्यामुळे त्यांनी १ हजार स्क्वाट्स मारण्याचे चॅलेंज घेतले. हा व्हिडिओ यूट्यूबवर देखील अपलोड करण्यात आला. स्क्वाट्स मारल्यानंतर काही वेळ सगळं काही ठीक होते. परंतू नंतर दुसऱ्या दिवशी दोघींच्या पायाला त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यांना त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितले की, जास्त स्क्वाट्स मारल्यामुळे त्यांचे पायचे स्नायू दुखावले आहेत आणि किडनीला इजा झाली आहे. त्यांची तब्येत सध्या अत्यंत बिघडली आहे. त्यामुळे अशा प्रकारापासून सावध राहणाचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like