‘दारू नका पिऊ’ नका म्हणून रोखणाऱ्या पत्नीची गळा चिरू हत्या !

पानीपत : पोलीसनामा ऑनलाईन – वारंवार दारू पिऊन घरात गोंधळ घालणा-या दारुड्या पतीला पत्नी दारू पिऊ नका, असे सांगत होती. मात्र त्यावेळी नशेत तर्र असलेल्या पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीचा गळा चिरून हत्या (wifes Murder) केली. त्यानंतर त्या क्रूरक्रर्मा व्यक्तीने पत्नीच्या मृतदेहावर खुर्ची ठेवली आणि त्यावर बसला. हरियाणाच्या (Hariyana) पानिपत जिल्ह्यातील रमेश कॉलनीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर गोंधळाचा आवाज आल्यानंतर त्यांची मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिने वडिलांचे हे रुप पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱच्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सोनू वर्मा असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर संजना वर्मा (वय 27) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतलौडा परिसरात सोनू वर्मा हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. गेल्या चार महिन्यांपासून तो रमेश कॉलनीत पत्नी संजना (26) आणि मुलगी (7), मुलगा (1) सोबत भाड्याने राहत होता. आरोपीच्या मुलीने सांगितले की, आई नेहमी बाबांना नशा करण्यापासून रोखत होती. शनिवारी वडिलांनी आईला खूप मारहाण केली आणि रात्रभर झोपू दिले नाही. सकाळी आई स्वयंपाक करीत होती. त्यावेळी वडिलांनी आईच्या मानेवर चाकूने वार केला. मुलीला आईचा आवाज आल्यानंतर ती खोलीतून बाहेर आली. त्यानंतर मुलीच्या आवाजाने शेजारीही जमा झाले. ते खोलीत गेले तेव्हा सोनू पत्नीच्या मृतदेहावर खुर्ची टाकून बसला होता. महिलेच्या गळ्यातून रक्त येत होते. यावेळी सोनू लोकांना सांगत होता की तिच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. म्हणून तिला मारले आहे. तो पुढे म्हणाला की, मी पळणार नाही आणि मी पोलिसांना घाबरत नाही, असे म्हणाला.
सेक्टर-29 ठाणे प्रभारी राजबीर सिंह म्हणाले की, या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार सोनू हा पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याचे समोर आले आहे.

You might also like