नागपुरमध्ये कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यास उमेदवारी न देण्याची मागणी…

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन- आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपुर मतदार संघातुन नाना पटोले यांना उमेदवारी न देण्याची मागणी, नागपुरातील अनेक अनुसूचित जातीमधील कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी ई-मेलच्या माध्यमातुन कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे केली.

नागपुर हे रा.स्व.सं चे मुख्यालय असतांना देखील येथील सामाजीक सलोखा कायम राहिलेला आहे. कुणबी समाज आणि अनुसूचित जमातीत कधीही वाद निर्माण झाला नाही. जर नाना पटोले यांना नागपुर मधून उमेदवारी दिली तर येथील सामाजीक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे ई-मेलमध्ये  वर्तवण्यात आले आहे.

पटोले यांच्या विरोधी मोहिमेच्या पाठीमागे नागपुरातील असलेले अर्तंगत राजकारण कारणीभूत आहे का याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करणे महत्वाचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसने आपला उमेदवार बदलावा, नाही तर या लोकसभेत कॉंग्रेसला मतदान मिळणार नाही. असे देखील यात व्यक्त केले आहे.

नाना पटोले यांनी खैरलांजी हत्याकांडानंतर पक्षपाती आणि जातीवादी भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी आरोपींचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केले होते. हे आम्ही आजुन विसरलेलो नाही. त्यामुळे पटोले यांची उमेदवारी बदलावी ती या समाजाची भावना दुखवणारी ठरेल, असं ही या ई-मेलमध्ये म्हंटले आहे.