‘उद्या होणाऱ्या साहित्य संमेलनाला जाऊ नका…’, ज्येष्ठ साहित्यिक ना धो महानोरांना ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्यापासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका अशी धमकी ज्येष्ठ साहित्यिक आणि संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांना देण्यात आली आहे.

ना. धो. महानोर याबाबत बोलताना म्हणाले, “माझ्या लेखी ही धमकी नाही. ते माझ्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलले. त्यांनी मला पत्रही दिलं. ते पत्र ब्राह्मण महासंघ पुणे यांचे प्रमुख अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र पाठवून सविस्तर लिहले आहे.”

पुढे बोलताना ना. धो. महानोर म्हणाले, “मला आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, दिब्रिटो यांची निवड आम्हाला मान्य नाही. नुकतेच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले दिब्रिटो यांची विचारसरणी, त्यांचं लेखन आणि इतर गोष्टी आम्हाला अमान्य असताना आम्ही पत्रक काढून त्यांचा निषेध करणार आहोत. मी त्यांना सांगितले की, घटनात्मक पद्धतीने आणि नियमाप्रमाणे एकमताने निवडणूक महामंडळाची निवडणूक होते. तशी त्यांची निवड झाली आहे. सर्व साहित्यिकांनी एकमताने त्यांची निवड केली आहे. असे असताना तुम्ही तिथे जाऊ नका. तुम्ही न जाणं हे उपयोगी ठरेल. या संदर्भात मला वेगवेगळ्या जिल्ह्यातूनही फोन आले.” असा खुलासा ना. धो. महानोरांनी केला. म्हणजे त्यांना केवळ पत्रच नाही तर फोन आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/