माझ्याकडे सध्या अनेक महत्त्वाची खाती आहेत, त्यातच मी आनंदी : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मी माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देत आहे. माझ्याकडे सध्या अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही. असा विचार कधीच माझ्या मनात आलेला नाही. असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री व्हावं, असा विचार कधी डोक्यात आला का ? या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी असे म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना मदत करताना कधी स्वत:च मुख्यमंत्री व्हावं असे कधी वाटते का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. दरम्यान मी माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देत आहे. माझ्याकडे सध्या अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही. असा विचारही कधी माझ्या मनात आलेला नाही. असे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, भाजपा सरकार आल्यानंतर मोर्चे आंदोलन यांचे प्रमाण वाढले. त्यामागचे कारण काय ? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी भाजपा सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय संवेदनशील नेते आहेत. ते जनतेचे प्रश्न आधी समजून घेतात. मग ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. असेही त्यांनी म्हंटले.