झोपताना ‘या’ 5 गोष्टी अजिबात जवळ ठेऊ नका, अन्यथा वाढेल ‘कर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा आपल्याला व्यक्तींच्या सवयीनमध्ये मोठे साम्य आढळते. जसे की सकाळी उठल्यावर पाणी पिणे, झोपण्याच्या आधी मोबाइल तपासणे. अशा प्रकारच्या सवयी अनेकांना असतात. झोपण्याच्या आधी अनेकांनी आपल्या उशाशी (डोक्याजवळ) काहीना काही ठेवण्याची सवय असते. वास्तू शास्त्राच्या हिशोबाने असे केल्याने तुमच्या आसपास काहीनाकाही नकारात्मक एनर्जी तयार होते.

झोपण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी तुमच्या डोक्याजवळ ठेऊ नहेत असे करणे अशुभ मानले जाते.

1. पर्स किंवा पाकीट
अनेक लोकांना झोपण्याआधी आपले पाकीट काढून डोक्याजवळ ठेवण्याची सवय असते. परंतु असे करणे योग्य नाही कारण असे मानले जाते की हे केल्यामुळे विनाकारण तुमचा खर्च वाढतो. पैशांना कायम कपाटात किंवा तिजोरीत ठेवले पाहिजे.

2. न्यूजपेपर (वर्तमानपत्र)
झोपण्यापूर्वी अनेकांना पेपर वाचण्याची सवय असते. असे करणे देखील वास्तुशास्त्राच्या हिशोबाने चुकीचे समजले जाते. त्यामुळे झोपताना डोक्याजवळ वर्तमानपत्र अजिबात ठेऊ नका.

3. दोरी
झोपताना जर दोरी सोबत असेल तर तुमच्या कामामध्ये अनेकदा अडथळे येऊ शकतात असे मानले जाते म्हणून झोपताना डोक्याजवळ कसल्याही प्रकारची दोरी ठेऊ नका.

4. कसलेच इलेक्ट्रॉनिक सामान नको
अनेकदा आपण मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक सामान डोक्यपाशी ठेऊन झोपतो परंतु असे करणे अशुभ मानले जाते. कारण यातून निघणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वेव शरीर आणि मन दोन्हींवर परिणाम करू शकतात.

5. एखादी जड वस्तू
वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्यापाशी एखादी जड वस्तू ठेऊन झोपू नका. असे मानले जाते की, डोक्याजवळ एखादे जड सामान ठेऊन झोपल्याने परिवारात भांडणे होऊ शकतात.

 

Visit : policenama.com