भटकळ कोणत्या कारागृहात आहे हे माहित नाही : एटीएस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील मुख्यआरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) हा सध्या कोणत्या कारागृहात आहे, याची आम्हाला माहिती नाही, असे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितले आहे. ही माहिती एटीएसने लेखी स्वरूपात न्यायालयात दिली आहे, असे यासिनचे वकील अ‍ॅड. जहीरखान पठाण यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी येरवडा कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3a2f3b4-be21-11e8-be0e-69f8a5e25e69′]

सर्जिकल स्ट्राइकचा वर्धापन दिन वादात, सक्ती नसल्याचे जावडेकरांचे स्पष्टीकरण

१३ फेब्रुवारी २०१० रोजी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ जण मृत्युमुखी पडले होते. तर, ५६ जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच परदेशी नागरिकांचाही समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला. यासीन भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात उघड झाले होते. स्फोट घडवून आणल्यानंतर फरार असलेल्या भटकळला गुप्तचर यंत्रणांनी नेपाळच्या सीमेवरुन सौनाली या गावातून अटक केली होती. त्याचा ताबा १३ मार्च २०१४ रोजी एटीएसकडे सोपविला होता.

व्हाईटनरच्या नशेत गुरफटलीत शेकडो मुले

त्यानंतर भटकळला १४ मार्च २०१४ रोजी पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. भटकळ याच्यावर जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी आरोप निश्‍चित करायचे आहेत. मात्र, २२ ऑगस्ट २०१४ नंतर ७१ न्यायालयीन सुनावण्यांना तो हजर राहिला नाही. याबाबत न्यायालयाने एटीएसला विचारणा केल्यानंतर एटीएसने न्यायालयाकडे तो सध्या कोणत्या कारागृहात आहे याची माहिती नसल्याचे म्हटले, अशी माहिती अ‍ॅड. पठाण यांनी दिली. एटीएसची ही माहिती धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

You might also like