नितीन गडकरी संतपाले, म्हणाले – ‘मला पुन्हा नक्षलवादी होण्यास भाग पाडू नका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या समोरच रस्ते बांधणीच्या कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना गडकरी यांनी खडे बोल सुनावत विकासकामांच्या फाइल अडवून ठेऊ नका असे आदेश दिले आहेत.

यावेळी नितीन गडकरी यांचा राग अनावर झाल्याचे पहायला मिळाले. मी आधी नक्षलवादी होतो नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गेलो. मला पुन्हा नक्षली व्हायला भाग पाडू नका,’ असा इशारा गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच रस्त्यांच्या कामासाठी विजयन यांनी मला भेटण्याची ही पाचवी वेळ आहे. हे लज्जास्पद आहे, अशी खंत नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केली.

आपल्या या इशाऱ्यामध्ये गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांना रस्ते बांधणीसाठी जमीन अधिग्रहण करायला अल्टीमेटम दिला आहे. वेळेत कामं झाली नाहीतर गाठ माझ्याशी आहे असंही गडकरींनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. केरळमधील रस्त्यांमध्ये पंचवीस टक्के रस्ते बनवण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचे या प्रकल्पना लवकर मंजुरी देण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्र्यांनी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती यादरम्यान नवीन मार्ग बनवताना स्थनिकांच्या पुनर्वसनाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. काही महिन्यांपूर्वी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी आरएसएस वर आरोप केले होते की केरळमधील रस्त्यांचे प्रकल्प अडवून ठेवण्यामध्ये संघाचा हात आहे.

Visit : Policenama.com