प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाला जोडून एक अपडेट समोर आले आहे. जे की, सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. असे समजले जाते की, भूमि एक्शन ‘साहो’ ड्रामामध्ये दबंग खान कैमियो भूमिका साकारणार आहे. जवळजवळ चित्रपटाची शुटिंग पुर्ण होत आली आहे. याचा टिजरही प्रदर्शित झाला आहे. जर सलमान कैमियो भूमिकेसाठी तयार झाला तर त्याचा पार्ट शूट करुन चित्रपटात अ‍ॅड केला जाईल.

सुत्रांनी माहिती दिल्यानुसार, नील नितीन मुकेश ‘साहो’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. नील आणि सलमानचे नाते खुप जवळीक आहे. दोघांनी सोबत ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात निलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. नीलने कैमियो रोलसाठी निर्मात्यांकडे सलमान खानची शिफारस केली आहे. त्यानंतर निर्मात्याने सलमानला कैमियो भूमिका ऑफर केली असून अजुनही या भूमिकेसाठी सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

प्रभासने चित्रपटाचा नवीन लुक पोस्टर शेअर केला होता. ‘साहो’ चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘साहो’ चित्रपटाचे निर्देशन सुजीतने केले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर, मंदिरी बेदी, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, चंकी पांडे हे मुख्य भूमिकेत असणार आहे.

सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘भारत’ च्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. ‘भारत’ चित्रपटामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ असणार आहे. चित्रपटाचे निर्देशन अली अब्बास जफरने केले आहे.