ट्रेन दुर्घटनेचे राजकारण नको : नवज्योतसिंग सिद्धू

अमृतसर :  पोलीसनामा ऑनलाईन – अमृतसर येथे रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची धक्कादायक घटना  घडली.   या दुर्घटनेत ६१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाले.  इतकेच नव्हे तर ७२ पेक्षा जास्त जण जखमी आहेत. यादरम्यान  कार्यक्रमाला उपस्तित  पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी होत्या यांना अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी  घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी  केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान रावणदहन पाहाण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते. त्यावेळी जोर जोरात फुटत असलेल्या फटाक्यांमुळे सर्व जण मागे सरकू लागले. यादरम्यान तिथे असलेल्या बंद रेल्वे फाटकात जाऊन उभे राहिले, फटाक्यांच्या आवाजामुळे आणि ते पाहण्यात दंग झाल्यामुळे रेल्वे येत असल्याचे  कोणालाही कळले नाही,  डोळ्याची पापणी लावण्याच्या आधीच ट्रेन तिथे असलेल्यानां  चिरडून गेली, हि धक्कादायक घटना घडल्याने तिथे आसलेल्यांना काही कळलेच नाही आणि त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तिथूनच जाणारी दुसरी ट्रेनही सर्वांना चिरडून निघून गेली. यादरम्यान ६१ हुन अधिक जण मृत्यू तर ७२ हुन अधिक जण जखमी झाले आहेत. यादरम्यान कार्यक्रमाला  पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू   या उपस्थित होत्या अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी  घटनास्थळावरून पळ काढला असा आरोप  प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

बलात्कार तोकड्या कपड्यांमुळे : एसएनडीटी कॉलेज

मात्र हा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी फेटाळून लावले आहे. इतकेच नव्हे तर ही  दुर्घटना  अत्यंत दुर्देवी आणि दु:खद घटना आहे. ही दुर्घटना म्हणजे नियतीचा घाला आहे. तसेच हा अपघात होता हे सर्वप्रथम आपन  समजून घेतले पाहिजे. निश्चित दुर्लक्ष झाले पण हे कोणी जाणीवपूर्वक हेतू किंवा उद्देशाने घडवून आणलेले नाही. या दुर्घटनेचे  राजकारण करू नका असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने  पाच लाखांची मदत जाहीर केली आहे इतकेच नव्हे तर ट्रेन प्रचंड वेगात येत असताना काही मिनिटात हा अपघात घडला. ट्रेनकडून कुठलाही हॉर्न देण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले.

बीड लोकसभा मतदारसंघात DM विरुद्ध PM लढत होणार !