रात्री झोपताना मोबाईल ठेवा दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रात्री झोपताना काहीजण मोबाईल उशाशी ठेऊन चार्ज करतात. ९० टक्के लोकं अशाप्रकारे मोबाईल उशाशी ठेवून झोपतात. फोन आला तर न उठताच मोबाईल घेता येईल असा यामागे हेतू असतो. तसेच सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहता यावा यासाठी देखील काहीजण तो उशाशी ठेवतात. पण, याचे गंभीर परिणाम कुणीच लक्ष देत नाही. तसेच मोबाईल रात्रभर डोक्याजवळ ठेवल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
अलिकडे मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना देखील सातत्याने घडताना दिसतात. चार्जिंग सुरू असताना कधीही मोबाईल बोलू नये. मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये. फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलावर ठेवा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये. मलेशियामध्ये मोबाईल चार्जिंग करताना स्फोट झाल्याने एका नामांकित कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाझरिन हसन यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. काहींना मोबाईलचा विरह सहन होत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या भांडूप परिसरातील हॉटेलमध्ये खिशात मोबाईलचा स्फोट झाल्यानं एक व्यक्ती जखमी झाला होता.

ही घटना ताजी असताना आता मलेशियामधील एका व्यक्तीचा स्मार्टफोनचा स्फोट झाल्यानं मृत्यू झाला आहे. हसन स्मार्टफोन वापरत होते. मोबाईल चार्जिंगसाठी त्यांनी बेडरूममध्ये ठेवला होता. पण अवघ्या काही क्षणातच मोबाईलचा स्फोट झाला आणि रूममध्ये आग लागली. मोबाईल जास्त गरम झाल्यानं ही आग लागली. स्फोटामुळे खोलीत धूराचं साम्राज्य पसरलं आणि श्वास कोंडून हसन यांचा मृत्यू झाला. १९९४ मध्ये हसन यांनी इंग्लंडमधील विद्यापीठातून लॉ ची पदवी घेतली होती. या समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.