Google वर ‘या’ गोष्टी चुकूनही सर्च करु नका, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही काय करता, कुठे जाता, कोणाला मेसेज करता एकूणच तुमच्या इंटरनेट विश्वातली कुंडली ‘गूगल’कडे असते. गुगलवर एखादी वेबसाईट अथवा यूआरएल ओपन करणं महागात पडू शकतं. त्यामुळे गुगलवर एखादी माहिती शोधताना सतर्क असणं गरजेचं आहे.

1) बँकेची ऑनलाईन वेबसाईट –
तुमचं अकाऊंट असलेल्या बँकेची अधिकृत वेबसाईट माहीत नसल्यास ती गुगलवर सर्च करू नका. कारण अनावधानाने जर दुसरी फेक वेबसाईट ओपन करून बँक लॉगिंग आयडी आणि पासवर्ड टाईप केला तर त्यावर युजर्सची सर्व माहिती सेव्ह होते. या माहितीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.

2) Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स –
ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देत असतात. त्यामुळे या रिसीटच्या माध्यमातून गुगल युजर्सच्या ऑनलाईन शॉपिंगवर नजर ठेवून असतं.

3) पर्सनल फायनान्स आणि शेअर मार्केट
केवळ अधिकृत वेबसाईटवरच पर्सनल फायनान्स आणि शेअर मार्केटसंबंधीत माहिती सर्च करा. अन्यथा युजर्सची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

4) कस्टमर नंबर
फोनच्या माध्यमातून पासवर्ड आणि ओटीपीसारख्या गोष्टी मागितल्या जातात. त्यावेळी कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. एखाद्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून कस्टमर नंबर सर्च करा. अन्य ठिकाणांवरून सर्च केल्यास फ्रॉड होण्याची शक्यता असते.

5) अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर
गुगलवरून अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना काळजी घ्या. कारण गुगलवर थर्ड अनेक बोगस अ‍ॅप्स सध्या उपलब्ध आहेत. यावरून युजरची माहिती लीक होण्याचा धोका आहे.

6) आयडेंटिटी
गुगलवर सर्चचा वापर चुकूनही कधी आपली आयडेंटिटी  सर्च करण्यासाठी करू नये. कारण गुगलकडे तुमची सगळी सर्च हिस्ट्रीचा डेटाबेस असतो. आणि पुन्हा पुन्हा ते सर्च केल्याने हा डेटा लीक होण्याचा धोका होतो.

7) जाहिराती –
गुगलवर कधीही अनसीक्युअर माहिती सर्च करू नका. जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला त्यासंबंधी जाहीराती दिसू लागतात. त्यामुळे हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला इंटरनेटवर कोण फॉलो करत आहे.

You might also like