‘कोणाला घाबरू नका, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका’ ; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेला ‘सल्ला’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरु नये. सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हणले आहे. यावेळी ते म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशहिताचे आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी विरोधक स्वीकारावं. हे विधेयक देशासाठी आवश्यक आहे.

देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करण्यास तयार असल्याचे सांगत आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं लोकसभेत समर्थन केले अन् राज्यसभेत पळून गेले, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे महाराष्ट्रात सरकार आहे त्यामुळे राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करु नये. देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे.

आशिष शेलार म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर आमचा पराभव झाला आहे. या 12 जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पराभव नेमका का झाला याचा अहवाल सादर करणार आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे तीन पक्षांनी एकत्र आलेलं आणि स्थापन केलेलं ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगवर्यादा असते. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध आहे. हे आताच सांगता येत नाही की हे सरकार किती दिवस चालेल. परंतू शिवसेनेने आजही साद दिली तर आमची दारे उघडी आहेत. आम्ही तर कधीही हाक द्यायला तयार आहोत मात्र समोरुन प्रतिसाद देखील यायला हवा.

यानंतर फडणवीसांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाहीत, तेव्हा कडी कुलूप लावून बसले. आता वेळ निघून गेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like