चीनच्या परराष्ट्र्रमंत्र्यांना पुन्हा पाकिस्तानचा पुळका ; भारताला दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानमधील शांघाय येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय सम्मेलनात पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर टार्गेट केले जाऊ नये, असा इशारा चीनने दिला आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामाबादमधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केल्यानंतर चीनने दिलेला हा इशारा म्हणजे भारतालाच दिलेला आहे, असे बोलले जात आहे.

भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्यानंतर त्यांनी मालदीवला भेट दिली. या दौऱ्यात मोदींनी शनिवारी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तान हा दहशतवादाचा जगातील सर्वात मोठा पुरस्कर्ता असल्याचा आरोप देखील केला. आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकट पाडण्यासाठी आणि अलिप्त ठेवण्यासाठी परराष्ट्रीय धोरणाचाही एक भाग म्हणून भारत या आठवड्यात होणाऱ्या संमेलनात भारत दहशतवादाचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे. परंतु याबाबतीत पाकिस्तानला टार्गेट न करण्याची ताकीद चीनने दिली आहे. याविषयी बोलताना चीनचे उपपरराष्ट्रमंत्री झांग हनुई यांनी सांगितले कि, या परिषदेत आर्थिक सहकार्य आणि सुरक्षा सहकार्य आणि दहशतवादावर कशा प्रकारे मात करता येईल, यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या परिषदेत सुरक्षा आणि विकास या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहेत. या परिषदेच्या स्थापने मागचा हाच उद्देश आहे. कोणत्याही एका विशिष्ट विषयाला टार्गेट न करता आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्व विषयांवर याठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

 

Loading...
You might also like